
पुणे : तांत्रिक अडचणींमुळे गेली तीन वर्षे बंद असलेले शहरातील समाजकल्याण विभागाचे वसतिगृह अखेर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. याविषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची गंभीर दखल घेऊन समाजकल्याण विभागाने हे वसतिगृह पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले आहे. यामुळे सुरक्षित निवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.