पुण्यात चोरट्यांनी अख्ख दुकान फोडलं, पण होमगार्ड जवानांनी साधं हटकलं सुद्धा नाही

Crime_Burglary
Crime_Burglary

किरकटवाडी (पुणे) : नांदेड (ता.हवेली) येथील माने कॉंप्लेक्समधील कपडे आणि चप्पलचे दुकान चोरट्यांनी फोडून कपडे, चप्पल, इतर वस्तू गाठोडे बांधून घेऊन गेले. बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्ड जवानांच्या समोरुन चोर गेले परंतु त्यांनी चोरांना साधे हटकलेसुद्धा नाही. 27 मार्च रोजी सकाळी अर्धवट उचकटलेले दुकानाचे शटर आणि बाहेर पडलेल्या काही कपड्यांच्या पिशव्यामुंळे चोरी झाल्याचे निदर्शनास आले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता त्यामध्ये काही चोर दुचाकीवर तर काही पायी चालत दुकानातील माल चोरुन नेताना दिसत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे मागील जवळपास वर्षभरापासून दोन होमगार्ड जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. चोरी झाली त्या रात्रीही होमगार्ड बंदोबस्तासाठी होते परंतु समोरुन एवढ्या रात्रीच्या वेळी चालत आणि दुचाकीवरून माल घेऊन पुढे तो रिक्षात टाकून घेऊन गेलेल्या चोरांना या होमगार्ड जवानांनी साधे हटकले सुद्धा नाही. रात्रीची संचारबंदी असताना तुम्ही काय करताय? अशी विचारणा देखील न केल्याने चोर विनाअडथळा चोरी करुन निघून गेले. यामध्ये सुमारे पंचावन्न हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाली असून दुकानमालक हर्षवर्धन जगदीश घुले यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हवेली पोलीसांकडून चोरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी दिली.

सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआरही नेले चोरुन
चोरांनी कपडे, चप्पलचे बॉक्स असा दुकानातील मुद्देमाल तर चोरुन नेलाच, शिवाय सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही चोरुन नेला.

रात्रगस्त होते केवळ नावापुरती
मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्याच्या कडेची दुकाने, बंद घरं फोडून चोरट्यांनी व्यावसायिक आणि नागरिकांचा लाखोंचा माल लुटला आहे. दररोज हवेली पोलिसांची गाडी 'सोईनुसार' नावापुरती रात्रगस्तीला फिरते. त्यामुळे ना चोर पकडले जातात न चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com