Ajit Pawar : शिंदे गट गुवाहाटीला कोणाचा बळी देणार?

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. त्यांना शुभेच्छा. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो.
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on
Summary

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. त्यांना शुभेच्छा. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो.

पुणे - ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. त्यांना शुभेच्छा. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो. शिंदे गट आता कोणाचा बळी द्यायला गुवाहाटीला चालले आहेत, हे माहीत नाही,’ असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सत्तांतराचे नाट्य गुवाहाटीत घडले होते. त्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. या मुद्यावर पवार म्हणाले, ‘देवदर्शनाला जात असतील तर शुभेच्छा आहेत. काही ठिकाणी कोंबड्याचा, बकऱ्याचा बळी देतात. परंतु कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात, ते कोणाचा बळी द्यायला जात आहेत, माहीत नाही.’

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पवार पहिल्यांदाच हजर होते. ‘ज्यावेळी लोक सांगतात, विरोधी पक्षात बसा त्यावेळी विरोधी पक्षात राहून काम करावे लागते. पुन्हा लोकांनी जर सत्तेत बसण्याची जबाबदारी दिली तर पालकमंत्री म्हणून बसणारच आहोत,’ अशी टिपण्णीही पवार यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्याची वेळ येऊ देवू नका, असा इशारा दिला होता. त्यावर ठाकरे यांच्या आवाहनाला आपला ‘सकारात्मक प्रतिसाद’ राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पाणीपुरवठ्याबाबत समतोल ठेवावा

जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. परंतु शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याबाबत समतोल राखला पाहिजे. महापालिकेने पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. जलसंपदा विभागाने कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात. कालव्यालगतच्या विहिरींची पाणीपट्टी बंद करण्यात यावी, अशी मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे. तसेच, महापालिकेतील नवीन समाविष्ट गावांना पाणीपुरवठा होत नसतानाही पाणीपट्टी वसूल केली जात आहे. त्यावर समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कामे लवकर पूर्ण करण्याची गरज आहे, असे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com