जेवण न दिल्यामुळे पुण्यात पत्नीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

जेवण न दिल्यामुळे एका रिक्षाचालकाने पत्नीला मारहाण करुन तिचा खून केल्याची घटना बिबवेवाडी येथील इंदिरानगर परिसरात घडली.

Pune Murder : जेवण न दिल्यामुळे पत्नीचा खून

पुणे - जेवण न दिल्यामुळे एका रिक्षाचालकाने पत्नीला मारहाण करुन तिचा खून केल्याची घटना बिबवेवाडी येथील इंदिरानगर परिसरात 30 जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. सविता संदीप अवचिते (वय ३२, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

या संदर्भात गणेश दत्तात्रेय शिंदे (वय ३३, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती परशुराम उदडंंप्पा जोगन (वय ३८) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

रिक्षाचालक जोगन याची सविता अवचिते दुसरी पत्नी आहे. मध्यरात्री जोगन हा घरी गेल्यानंतर त्याने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. परंतु तिने जेवण न दिल्यामुळे जोगन याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे सविताचा मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या जोगन याला पोलिसांनी अटक केली.