

Pune weather forecast minimum temperature
Sakal
पुणे : शहरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळच्या थंडीचा जोर कायम असून किमान तापमानाचा पारा सतत घसरत आहे. त्यामुळे पुणेकरांनी रविवार, सोमवार आणि मंगळवारी सलग तीन दिवस हुडहुडी अनुभवली. पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील कोरडेपणा वाढल्याने आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक तीव्र झाल्याने हिवाळ्याची तीव्रता जाणवत आहे.