Pune Woman Rescue : दुबईत नोकरीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय; मुरलीधर मोहोळ यांचे पोलिस आयुक्तांना पत्र, सखोल चौकशीची मागणी

Woman Rescued Safely from Dubai After Being Lured by Fake Job Offer : दरमहा सव्वा लाख रुपये पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून दुबईत नेलेल्या महिलेची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुखरूप सुटका करण्यात आली. महिलांच्या परदेशातील फसवणुकीचे रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
मुरलीधर मोहोळ

मुरलीधर मोहोळ

esakal

Updated on: 

पुणे : दरमहा सव्वा लाख रुपये पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून दुबईला नेलेल्या आणि तेथे अनैतिक कृत्यासाठी डांबून ठेवलेल्या एका महिलेची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुखरूप सुटका झाली आहे. दरम्यान, नोकरीच्या आमिषाने महिलांना परदेशात पाठवून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मोहोळ यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र दिले आहे.

Loading content, please wait...