येडगाव धरणाच्या जलाशयात बुडून पुणे येथील पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children drown

येडगाव (ता. जुन्नर) धरणाच्या जलाशयात इशान आखिल कढि (राहणार अल्फा बिल्डींग, मेघविहान सोसायटी, पंढरीनगर, हांडेवाडी चौक, पुणे) या पाच वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

Children Drown : येडगाव धरणाच्या जलाशयात बुडून पुणे येथील पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नारायणगाव - येडगाव (ता. जुन्नर) धरणाच्या जलाशयात इशान आखिल कढि (राहणार अल्फा बिल्डींग, मेघविहान सोसायटी, पंढरीनगर, हांडेवाडी चौक, पुणे) या पाच वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या बाबत ताटे म्हणाले, आळेफाटा(ता.जुन्नर) येथील डॉ. राजेंद्र शामराव धांडे यांच्या समवेत पुणे येथील अखिल भरतकुमार कढि व त्यांचे तीन मित्र सहकुटुंब आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येडगाव धरण जलाशयाजवळ फिरण्यासाठी गेले होते. जेवण झाल्या नंतर अखिल कढि हे मुलगा इशान (वय-५) याला खांद्यावर घेऊन जलाशयात उतरले. दरम्यान अंदाज न आल्याने खडकावरून त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. या वेळी इशान (वय-५) पाण्यात पडून बुडून खोल पाण्यात वाहत गेला.

धरण परिसरात मासेमारी करणाऱ्या तरुणांनी सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर इशानला बाहेर काढले. दरम्यान नारायणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या पूर्वीही आशा घटना घडल्या आहेत. येडगाव (ता. जुन्नर) धरण जलाशय परिसरात फिरण्यास परवानगी नाही. धरण परिसरात चोवीस तास बंदोबस्त आहे.परवानगी नसताना सुद्धा नागरीक सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी येत असतात.