

Tragic Accident at Shastri Nagar Chowk: Young Biker Killed by Private Bus
sakal
पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी बसचालकास अटक केली आहे.