विद्यार्थ्यांचा योगासनांतून आरोग्याचा संदेश

विद्यार्थ्यांचा योगासनांतून आरोग्याचा संदेश
Published on

पुणे, ता. २२ : जागतिक योग दिनानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये योग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे आरोग्याचा संदेश दिला.
सदाशिव पेठ येथील हुजूरपागा शाळेत सुमारे १२०० विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार, बैठी व उभी योगासने तसेच तालीयोगाचे सादरीकरण केले. कबीर बाग येथील लक्ष्मीदत्त मेढेकर आणि स्नेहल मेढेकर यांनी विद्यार्थिनींकडून प्रात्यक्षिके करून घेतली. मुख्याध्यापिका जयश्री मुजुमुले यांनी मार्गदर्शन केले.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील कार्यक्रमात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी सहभाग घेतला. योग प्रशिक्षक सिद्धार्थ बाबर यांनी विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके सादर करून घेतली.
सोमवार पेठेतील मुलींचे आगरकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थिनी व योग प्रशिक्षक अद्विती पंडित मंगळवेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी व शिक्षकांनी योगाभ्यास केला. यावेळी मुख्याध्यापिका मेघना कोष्टी उपस्थित होत्या.
कोथरूड येथील म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक झाले. मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योगाची सवय अंगीकारण्याचे आवाहन केले.
बावधन येथील चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम शाळेत सहजयोग ध्यानधारणा संस्थेचे महेश मोकाशी आणि शिल्पी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे फायदे समजावून सांगितले. क्रीडाभारतीचे अध्यक्ष विजय रजपूत आणि ज्योती गोसावी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोंढवा येथील श्रीमती कलावती बधे ज्युनिअर कॉलेजमध्ये योगाचार्य धन्नालाल भोरटके यांच्या प्रमुख उपस्थितीत योगदिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच, गुरुवार पेठेतील सेंट हिल्डास हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींकडून योगासने करून घेण्यात आली.
डेक्कन जिमखाना येथील प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्येही योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा साधना गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वमग्न विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. उमा खरसे आणि मृणाल ढोले यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.

29053, 29054, 29055

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com