

Tragic Incident: 22-Year-Old Pune Youth Drowns in Panshet Dam Resort Area
Sakal
वेल्हे : राजगड तालुक्यातील पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एका २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (ता.२५) रोजी दुपारी घडली. अंकुश मनोज चौधरी (रा. मलिक नगर, कोंढवा खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृत तरुणाचा मावस भाऊ सत्यम संतोष झा यांनी पानशेत (ता.राजगड)पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.