पुण्यातील मगरपट्टा परिसरात काल सायंकाळी एक संतापजनक घटना घडली. एका तरुणाने भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे..नशेत तरुणाची उचापतघटना संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण प्रचंड नशेत होता. त्याने मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकावर हात उचलला. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर दगड फेकण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून स्थानिकांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि त्या तरुणाला आवरले..वाहतूक पोलिसाला मारहाणघटनेच्या वेळी रासकर चौकात वाहतूक पोलीस शिपाई पवार हे कर्तव्यावर होते. त्यांनी त्या तरुणाला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राग अनावर झालेल्या तरुणाने शिपाई पवार यांच्यावर हल्ला चढवला. यामुळे परिसरातील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले..Pune Video: दहशत पसरवणाऱ्या तीन तरुणांची मुळशी पॅटर्न स्टाईल धिंड; पुण्यात नेमकं काय घडलं?."प्रसाद" मिळताच झाली शुद्धीपोलिसांनी संबंधित तरुणाला येरवडा पोलीस ठाण्यात नेले. ज्या हाताने त्याने पोलिसाला मारहाण केली, त्याच हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याचा चौरंग करुन पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..व्हायरल व्हिडिओने समाजात संतापघटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर अनेकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या अशा घटनांना कडक शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे..Mountain Climbing Shocking Video: हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, पहाडावरून पडता-पडता थोडक्यात वाचली तरुणी...Video Viral.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.