Pune : येरवडा येथील जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यूझाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Soldie
Soldieesakal

विश्रांतवाडी - येरवडा येथीलजिल्हा क्रीडासंकुलाच्या आवारातील जलतरण तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आजरविवारी दुपारी घडली. या घटनेत शिरीषपंडित सुतार (वय 37 वर्षे, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी ) याचा मृत्यू झालाआहे.

Soldie
Pune : उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम समाजासाठी खर्च करा; अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवड्यातील जिल्हा क्रीडासंकुलाच्या आवारातील जलतरणतलावात शिरीष दुपारी तीनवाजण्याच्या सुमारासकुटुंबीयांसमवेत आला होता. त्याच्यासमवेत बायको, मुले, भाऊ असे काहीजण होते. पाण्यात उतरल्यानंतर सव्वातीनवाजण्याच्या सुमारास अचानक तो बुडू लागला.

Soldie
Mumbai News : आधीच गर्मी, त्यात अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकांतील सरकते जिने बंद!

त्याच्यासोबत इतर तरुणांनी त्यालातलावातून बाहेर आणले.उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यूझाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्याचा मृत्यू नेमका कोणत्याकारणामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी गुन्हे निरीक्षक जयदीप गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

शिरीष याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे जलतरण तलावातील पुरेशा सुविधांचा अभाव व तेथील सुरक्षेचा प्रश्न हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com