पुण्यातील तरुणाची साताऱ्यात गोळ्या झाडून हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shooting

शिरवळ, ता. खंडाळा येथील निरा नदीकाठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर खून झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पुण्यातील तरुणाची साताऱ्यात गोळ्या झाडून हत्या

खंडाळा (सातारा) - शिरवळ, ता. खंडाळा येथील निरा नदीकाठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे (Sanjay Patole) (रा. बिबवेवाडी, ता. पुणे) यांचा खून (Murder) झाला असल्याची धक्कादायक घटना (Incident) रविवारी सायंकाळी समोर आली. गोळी झाडून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर शिरवळसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून खुनाचे नेमके कारण व मारेकरी कोण, याची माहिती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, शिरवळमधील एका अपार्टमेंटवरील टेरेसवर संजय पाटोळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निदर्शनास आले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी व एलसीबी पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा झाल्यानंतर मृताची ओळख पटली असून तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी पथके तयार करुन हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

हेही वाचा: वाई-पाचगणी मार्गावर पसरणी घाटात बस जाळून खाक

घटनेचे गांभीर्य पाहता, घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, फलटण उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, गुन्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळ पोलिस निरीक्षक नवनाथ ढमाळ, राजकुमार भुजबळ, वृषाली देसाई यांनी भेट दिली. तसेच ठसे तज्ञालाही पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: Pune Youth Shoot Murder In Satara Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top