
पुणे : यावर्षीच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा परिषदेने एक अभिनव तंत्रज्ञान आधारित पाऊल उचलले आहे. ‘ई-टॉयलेट सेवा’ या नावाचे विशेष मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून वारी मार्गावरील फिरती शौचालये आणि त्यांची स्वच्छता यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.