
पुणे : जिल्हा परिषदेमध्ये ७५ सदस्य निवडून जाणार की ७३, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर शासनाकडून पुण्यामध्ये ७३ जिल्हा परिषद सदस्य आणि १४६ पंचायत समिती सदस्य असतील, यावर शिक्कामोर्तब केले. समाविष्ट गावांमुळे एकूण दोन गट, तर चार गण कमी झाले आहेत.