esakal | पुणे झेडपी कोरोना रुग्णांत राज्यात 'अव्वल'
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Zp

पुणे जिल्हा परिषदेने कोरोना रुग्णसंख्येतही राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक तब्बल ३० हजार कोरोना रुग्ण पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत सापडले आहेत.

पुणे झेडपी कोरोना रुग्णांत राज्यात 'अव्वल'

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे- पुणे जिल्हा परिषदेने कोरोना रुग्णसंख्येतही राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक तब्बल ३० हजार कोरोना रुग्ण पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत सापडले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याव्यतिरिक्त नगरपालिका आणि कटक मंडळांमधील रुग्ण वेगळे आहेत. दरम्यान, फक्त झेडपी हद्दीतील ७८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यात आढळून आले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका, १४ नगरपालिका, तीन कटक मंडळे आणि १ हजार ४०७ ग्रामपंचायती येतात. या सर्व संस्थांचा मिळून एकूण रुग्णांचा आकडा दोन लाख ३६ हजारांवर पोहोचला आहे.

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसाठी या एकूण संस्थांपैकी सर्व नगरपालिका, तीन कटक मंडळे आणि ग्रामपंचायती मिळून ग्रामीण पुणे जिल्हा समजला जातो. त्यातही फक्त ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रुग्ण हे जिल्हा परिषदेच्या हद्दीत मोडतात. हाच आकडा बुधवारी (ता.१६) रात्री ९ वाजता ३० हजार क्रॉस झाला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आज अखेरपर्यंत १ लाख २ हजार ७२४ कोरोना टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. यापैकी ३१ हजार ५८४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकूण बाधितांपैकी ७८७ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १८ हजार ७९४ उपचारानंतर कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत.

सध्या शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून  ८ हजार ६२९ जण उपचार घेत आहेत. तसेच अन्य २ हजार ५८७ कोरोना रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद हद्दीतील पहिला कोरोना रुग्ण हवेली तालुक्यातील मांजरी येथे आढळून आला होता.

Edited By - Prashant Patil

loading image