
पुणे : जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि १४६ गणांची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता. २२) प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील सर्व तहसील, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकांवर प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांमध्ये घट झाल्याने आरक्षणदेखील नव्याने करावे लागणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.