जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके करणार भाजपात प्रवेश

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले.
Asha Bochke
Asha BochkeSakal

नारायणगाव : जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले.या मुळे जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची राजकिय ताकद वाढणार आहे. काही शिवसेना कार्यकर्ते ,सरपंच व पदाधिकारी यांनी बुचके यांना पाठींबा जाहीर केल्याने आगामी निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.

Asha Bochke
अंकिता पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट; मांडल्या शेतकऱ्यांच्या मागण्या

सर्वसामान्याच्या मदतीसाठी सदैव पुढे असणाऱ्या आक्रमक महिला म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांची ओळख आहे. बुचके या पूर्वाश्रमीच्या मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या आग्रहास्तव वीस वर्षापुर्वी बुचके यांनी शिवसेनेत प्रवेश करून येणेरे गटातून प्रथम जिल्हा परिषद निवडणूक लढवून विजयी झाल्या. सलग चार वेळा त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. या माध्यमातून त्यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी तयार केली.माजी आमदार दांगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सन २००२ ते २०१९ पर्यंत तालुक्याची शिवसेनेची सूत्र त्यांच्या ताब्यात होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची खंबीर साथ त्यांना मिळाली.

Asha Bochke
पुणे : माऊंट मंदा-१ मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम

या कालावधीत त्यांनी जुन्नर पंचायत समिती, जुन्नर नगर पालिकेवर शिवसेनेचे भगवा फडकवला. विघ्नहर कारखाना, जुन्नर बाजार समिती या सहकार संस्थात त्यांनी कार्यकर्त्यांची संचालकपदी वर्णी लावली. या मुळे तालुक्यातील सहकारी संस्थात शिवसेनेचे पदार्पण झाले.शिवसेनेच्या उमेदवार म्हणून सन २००९ व सन २०१४ ची विधानसभा निवडणुक त्यांनी लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र पराभवामुळे खचून न जाता त्या तालुक्याच्या राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिल्या. एक काळ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या त्या खंद्या समर्थक होत्या. मात्र सन २०१९च्या विधानसभा निवडणुकी पूर्वी मनसेचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची सन २०१९ची विधानसभेची उमेदवारी सोनवणे यांना मिळाली. नाराज बुचके यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेतुन त्यांची हाकालपट्टी करण्यात आली.आपल्या हाकालपट्टीला माजी खासदार आढळराव पाटील व माजी आमदार सोनवणे यांना त्यांनी जबाबदार धरले. या दोघांवर त्यांनी जाहिर टीका केली.

हाकालपट्टी नंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटे, बाजार समितीच्या संचालक सुरेखा गांजळे, पंचायत समिती सदस्या दिलीप गांजळे, अर्चना माळवदकर, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, सरपंच योगेश पाटे, राजेंद्र मेहेर हे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते बुचके यांच्याशी एकनिष्ठ राहिले. याचा फटका सन २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला बसून सोनवणे पराभूत झाले. याची जाणीव झाल्याने नुकत्याच झालेल्या शिवसंपर्क अभियाना निमित्त झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला गाडण्यासाठी बुचके यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहन माजी आमदार सोनवणे यांनी केले. या मुळे बुचके या पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असे वातावरण तयार झाले होते.या बाबत बुचके म्हणाल्या माझ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करावा या माफक अपेक्षेने झाले गेले विसरून मी पुन्हा शिवसेनेत सक्रिय होणार होते. या बाबत लांडेवाडी येथे माजी खासदार यांचे सोबत चार वेळा मिटिंग झाल्या. माझ्या सोबत जेष्ठ नेते बाळासाहेब पाटे, प्रसन्ना डोके , संतोष खैरे, गांजाळे होते. मात्र मुळात मी शिवसेनेत प्रवेश करावा ही इच्छा माजी खासदार यांची नव्हती.

Asha Bochke
शेतकऱ्यांसाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचा सन्मान

या ठिकाणी मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शेवटी मी १५ ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भक्कम साथ देण्याचे जाहीर केल्याने मी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी बुचके यांनी माजी खासदार माजी आढळराव पाटील , माजी आमदार सोनवणे यांच्यावर टीका केली. एकुणच बुचके यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णयाचा फटका आगाऊ जिल्हा परिषद, पंचायत समिती, जुन्नर बाजार समिती व नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला बसणार आहे.या पुढे माजी खासदार माजी आढळराव पाटील , माजी आमदार सोनवणे काय भूमिका घेतात याकडे तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com