Global Guruji : पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षक होणार ‘ग्लोबल गुरुजी’; जिल्ह्यातील ५० जण जाणार परदेशात

पुणे शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने घेतला महत्त्वाचा निर्णय.
Teacher

Teacher

sakal 

Updated on

पुणे - शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांना जागतिक स्तरावरील अध्यापन पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी ‘ग्लोबल गुरुजी’ योजना पुढील आर्थिक वर्षात राबविण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ५० उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी परदेशात पाठवले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com