
कात्रज : पुणे-जोधपूर-पुणे दैनंदिन रेल्वेसेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. रेल्वे क्रमांक २०४९५ व २०४९६ या दोन रेल्वेगाड्या नियमीतपणे हडपसरवरून धावणार आहेत. त्यामुळे राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच रेल्वे प्रवासाचे बुकिंगही सुरु करण्यात येणार आहे.