पुणेकरांनो, सावधान, थंडीबरोबर कोराना पुन्हा वाढतोय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांनो, सावधान, थंडीबरोबर कोराना पुन्हा वाढतोय!

आजच्या (ता.१२)  एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २७९ जण आहेत. याशिवाय ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  गेल्या २४ तासांत  ६ हजार १५८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिवसभरात ‌१९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणेकरांनो, सावधान, थंडीबरोबर कोराना पुन्हा वाढतोय!

पुणे - : पुणेकरांनो सावधान, पुणे जिल्ह्यात थंडीबरोबच कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून थंडी आणि कोरोना वाढत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी दिवसभरात ६२२  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल (बुधवारी)  ५३३ रुग्ण सापडले होते.

आजच्या (ता.१२)  एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २७९ जण आहेत. याशिवाय ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  गेल्या २४ तासांत  ६ हजार १५८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिवसभरात ‌१९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ३० हजार ११२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख १२ हजार  ६९० कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत ८ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३७७ रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज पिंपरी चिंचवडमध्ये १७२ , जिल्हा परिषद क्षेत्रात ११४, नगरपालिका क्षेत्रात ५१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात सहा नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील आठ जण आहेत. पिंपरी चिंचवड ५ आणि   जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नगरपालिका आणि  कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही  रुग्णाचा मृत्यू झाला नाही.  नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या  ही काल (ता.१०) रात्री ८ वाजल्यापासून आज (ता.११) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

loading image
go to top