esakal | पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Punekar Confuse The government says shops are starting, traders have a different role

शहरातील व्यवहार टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य आणि जिल्हा प्रशासनाने घेतला असताना त्यास मात्र पुणे शहरातील व्यापारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. एकीकडे दुकाने सुरु करा, असे म्हणतात, तर दुसरीकडे रस्ते बंद ठेवले आहे. आदेशात कोणत्याही स्पष्टता नाही.

पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील व्यवहार टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य आणि जिल्हा प्रशासनाने घेतला असताना त्यास मात्र पुणे शहरातील व्यापारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. एकीकडे दुकाने सुरु करा, असे म्हणतात, तर दुसरीकडे रस्ते बंद ठेवले आहे. आदेशात कोणत्याही स्पष्टता नाही.  त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्व दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील व्यापार सुरळित करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरात काही अटी व शतीवर दुकाने सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्टता नाही. त्यामुळे व्यापारीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. यापाश्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाने दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, ' प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्टता नाही. त्यामुळे व्यापार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुकाने सुरू करा असे सांगितले जाते आहे. पण रस्ते बंद आहेत. कामगार कामावर कसे येणार. त्यांना कामावर येण्यासाठी पेट्रोल मिळणार का. त्यांच्या सुरक्षितेचे काय असे अनेक प्रश्न आहेत. एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. अशी परिस्थिती असताना एवढी घाई कशाला. आणखी काही दिवस व्यापार बंद ठेवला काही बिघडणार नाही. कारण नागरिकांची काळजी घेणे ही देखील आमची जबाबदारी आहे. त्यामुळे महासंघाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र आज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेटून देण्यात येणार आहे.'

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरातील दारूची दुकाने उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यावरही रांका म्हणाले, की आम्ही बाहेर पडलो तर पोलिस दंडूक्याने मारतात दुसरीकडे मात्र, दारुच्या दुकांनाकडे २ किमी लाईन लागते, सोशल डिस्टिंसिंग पाळले जात नाही हे योग्य आहे का? त्यामुळे दारुची दुकाने ही बंद ठेवली पाहीजे. ते उघडी ठेवण्यास आमचा विरोध आहे.