पुणेकरांनी पहिल्या डोसला केंद्रांवर केली गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination Line

पुणेकरांनी पहिल्या डोसला केंद्रांवर केली गर्दी

पुणे - दुसरा डोस (Dose) घेण्यासाठीचे अंतर वाढविल्याने त्याचा फटका बसला. त्यानंतर शहाणे झालेल्या महापालिकेने लसीकरणाच्या (Vaccination) नियोजनात बदल केला. उपलब्ध साठ्यापैकी साठ टक्के लस ४५ वयोगटाच्या वरील नागरिकांना पहिला डोस देण्यास परवानगी (Permission) दिल्याने केंद्रांवर गर्दी झाली होती. मात्र, दुपारनंतर काही केंद्रे ओस पडली होती, तर पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या २० टक्के नागरिकांना दुसरा डोस राखीव ठेवण्यात आला होता. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (Punekar crowded the first dose at the centers)

बुधवारी दिवसभरात एक हजार लोकांचे लसीकरण होऊ शकले होते. हा अनुभव विचारात घेऊन महापालिकेने अखेर गुरुवारसाठीच्या लसीकरणाच्या नियोजनात बदल केला होता. त्यानुसार ४५ वयोगटावरील नागरिकांसाठी पहिल्या डोसचे पुन्हा लसीकरण सुरू केले. उपलब्ध साठ्यापैकी ६० टक्के लस ऑनलाइन अपॉईंटमेंट आणि स्लॉट बुक केलेल्या नागरीकांना पहिला डोस उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे अनेक केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी उसळली होती. सर्व्हअरमध्ये अडचणी येत असल्यामुळे काही केंद्रांवर लसीकरणासाठी वेळ लागत होता. दुपारनंतर अनेक केंद्रांवर गर्दी नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर २२ एप्रिलपूर्वी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना दुसरा डोस देण्यासाठी पंधराच केंद्र असल्याने तेथे देखील गर्दी उसळली होती.

हेही वाचा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून पीएमपीला हवेत २२३ कोटी

‘हम नही सुधरेंगे’

लसीकरणातील राजकीय लुडबूड कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कडक सूचना दिल्या आहेत. केंद्रांवर बोर्ड, बॅनर लावण्यासही बंदी घातली आहे. अन्यथा गुन्हा दाखल करण्याचे इशारा दिला आहे. त्यावर राजकीय पुढाऱ्यांनी नामी शक्कल लढविली आहे. खराडी येथे एका माजी आमदाराच्या पुत्राने स्वतःचे फ्लेक्स लावलेला टेंपो लसीकरण केंद्राच्या बाहेर उभा केला आहे. या प्रकारावरून ‘हम नही सुधरेंगे’ असा मेसेज थेट महापालिका आयुक्तांना या निमित्ताने या युवा नेत्याने दिला आहे.

पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले नाहीत, मात्र सत्तर दिवस झाले आहेत. केंद्रांवर गर्दी नसल्याने चौकशी केली, तर नाही सांगण्यात आले. आतापर्यंत चार ते पाच वेळा केंद्रावर येऊन जावे लागले. कधी लस नाही, कधी नंबर आला, तर लस संपलेली. आम्ही काय नुसत्या चकरा मारायच्या का?

- सविता रोकडे, ज्येष्ठ नागरिक

मध्यंतरी दोन वेळा केंद्रावर येऊन गेलो. खूप गर्दी होती. त्यामुळे पहिला डोसदेखील घेऊ शकलो नव्हतो. आज गर्दी कमी असल्याने पहिला डोस घेणे शक्य झाले.

- शंकर मांगडे, ज्येष्ठ नागरिक

loading image
go to top