पुणे धावले! बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पहाटे सव्वापाच वाजता नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनला झेंडा दाखविण्यात आले. स्पर्धेचा मार्ग आणि पहाटेचे थंड वातावरण स्पर्धकांना वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविण्यासाठी उपयुक्त ठरला.  

पुणे : आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सक्रियतेचा संकल्प कृतीत उतरविण्याची प्रेरणा देण्यासाठी 'बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन'चं आज आयोजन करण्यात आलं होतं. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचं 'एपीजी रनिंग' या संस्थेनं संयोजन केलं होतं. यात तब्बल वीस हजार धावपटूंनी सहभाग घेतला. या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन मार्गाच्या दुतर्फा परिसरातील नागरिकांसह विविध संस्थांनी गर्दी गेली होती.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पहाटे सव्वापाच वाजता नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनला झेंडा दाखविण्यात आले. स्पर्धेचा मार्ग आणि पहाटेचे थंड वातावरण स्पर्धकांना वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविण्यासाठी उपयुक्त ठरला.  मुख्य शर्यतीसह पाच आणि दहा किलोमीटर शर्यतही आयोजित करण्यात आली होती. तसेच, फॅमिली मॅरेथॉनचंही आयोजन करण्यात आलं होतं.

अमेरिकेची ऑलिम्पियन धावपटू जॅनेट चेरोबोन-बॉक्कम स्पर्धेची "ब्रॅंड अँबेसिडर' आहे. पोलिस दलातील पुरुष-महिलांसाठी "पोलिस कमिशनर कप' आयोजित करण्यात आली होती. त्याला पोलिसांन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशन यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

28 कंपन्यांच्या संघांनी "कॉर्पोरेट कप' मध्ये भाग घेतला. स्पर्धेच्या मार्गावर नऊ ठिकाणी संयोजकांनी "चिअरिंग स्टेशन्स'ची निर्मिती केली होती. तेथे आउटडोअर एक्‍स्पर्ट, न्युट्रीशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर्स उपस्थित होते.  शरीराची लवचिकता, दमसास आजमाविण्याशिवाय त्यांना फिटनेस टेस्टही देता आली. त्यांना पूरक आहाराविषयी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात आलं. 

मुख्य स्टेडियममध्ये झुंबा डान्स, स्टंट आदींचे आयोजन करण्यात आलं होतं. तसच सेल्फी पॉइंटलाही पुणेकर धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekar participate in Bajaj Allianz Pune Half Marathon