
मार्केट यार्ड : मांसाहारी खवय्यांनी बुधवारी गटारी अमावस्या साजरी करत मोठ्या प्रमाणात मटण, मासळी आणि चिकनवर ताव मारला. आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी (ता. २४) होत असल्याने अनेक जण या दिवशी मांसाहारी खाणे टाळतात. त्यामुळे पुणेकरांनी बुधवारीच गटारी साजरी करत अनेकांनी पार्टीचा बेत आखला होता.