

E-Vehicles
पुणे - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि ई-वाहनांच्या दर्जात झालेली लक्षणीय सुधारणा, यामुळे पुणेकरांचा इलेक्ट्रिक वाहनांकडील कल झपाट्याने वाढला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात ई-कारच्या (चारचाकी) नोंदणीत तब्बल २३० टक्क्यांची वाढ झाली आहे. केवळ खासगी वाहनेच नव्हे, तर व्यावसायिक ई-वाहनांनाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे.