pune theft
sakal
पुणे - दिवाळीच्या सुटीचा फायदा घेत कुलूपबंद घरांवर पाळत ठेवून चोरट्यांनी रोकड, दागिन्यांवर डल्ला मारला. शहरात सहा ते १५ नोव्हेंबर या अवघ्या दहा दिवसांत घरफोडीच्या १२ घटना घडल्या असून, चोरट्यांनी ८६ लाख रुपयांचे सोने-चांदी, हिरे आणि रोकड लंपास केली. सणासुदीनंतरही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, आगामी काळात या घरफोड्या रोखण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.