

Bhau Flex Kadha Online Portal
esakal
पुणे - शहरातील अनधिकृत फ्लेक्सविरोधात महापालिकेने सुरू केलेल्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ या मोहिमेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोर्टलवर पहिल्याच दिवशी नागरिकांनी १५० हून अधिक अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्रे महापालिकेकडे पाठविली आहेत. विशेषता यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फ्लेक्सबाबत सर्वाधित तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत.