
-सौरभ ढमाले
पुणे : इतिहास, कला, साहित्य, राजकारण, कादंबरी, चरित्र आदी विषयांवरील मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील पुस्तकांचा खजिना असलेल्या ‘एक्स्प्रेस बुक सर्व्हिस’चा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. ‘इंडियन रीडिंग ऑलिम्पियाड’ या महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट बुक स्टोअर २०२५’ हा पुरस्कार या दुकानाला मिळाला.