Pune Weather Update
Sakal
पुणे
Pune Weather Update : पुण्यात उकाड्याची लाट; तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर
Pune Update : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुणे शहरासह उपनगरातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होऊन पारा ३३ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे, तर पुढील काही दिवसांत तो ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे : शहरातील उकाड्यात लक्षणीय वाढ झाली असून, शहर आणि उपनगर परिसरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.