खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये आज बुधवार (दि. १८ जून) रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ६.९७ टीएमसी म्हणजे २३.९१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी साठा फक्त ३.६६ टीएमसी म्हणजे १२.५७ टक्के इतका होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीने अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.