

पुणे - जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबासाहेब आढाव यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. ८) सायंकाळी ८.३० वाजता पुण्यातील पूना हॉस्पिटल येथे निधन झाले. कष्टकरी, बांधकाम मजूर आणि असंघटित कामगारांसाठी सातत्याने लढा देणारे हे ज्येष्ठ नेते अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कामगार व व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.