
Pune Latest News: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) कात्रज ते येरवडा असा बोगदा तयार केला जाणार असून, या कामासाठी प्रति किलोमीटर ४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दक्षिण ते उत्तर या भागाला जोडण्यासाठी वाहतुकीचे पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावेत यासाठी हा बोगदा तयार केला जाणार आहे.