

PMC standing committee tender
ब्रिजमोहन पाटील
पुणे : साथ रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुण्यात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (एमएसयू) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जागा ही निश्चित करण्यात आली होती. पण भाजपच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये उपसूचना देऊन जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पालाच खो घातला आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. केंद्राच्या प्रकल्पाल अडथळा होत असताना यास भाजपच्या एकाही नगरसेवकाने हरकत घेतली नाही.