Mukta Tilak Demise: गोपीनाथ मुंडे यांनी घडवलेल्या नेत्यांमध्ये मुक्ता टिळक यांचं नाव अग्रभागी येईल 

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेतृत्वापूढे आव्हान याच तरुण नेत्यांकडून देता येईल हे मुंडे यांनी ओळखलं होतं
Mukta Tilak
Mukta Tilak Esakal
Updated on

पुण्यातील कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मुक्ता टिळक या कर्करोगाशी झूंज देत होत्या. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई होत्या. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पण तसून लागत.

लग्नापूर्वी मात्र मुक्ता टिळक यांच्या माहेरी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. लहानपणापासून संघ संस्कारात त्या वाढल्या. शैलेश टिळक यांच्याशी लग्न झाल्यावर मात्र आपसूकच त्यांना राजकीय वारसा मिळाला. लोकमान्य टिळक, जयंत टिळक यांची परंपरा असलेल्या घरामुळे त्या योगायोगाने  समाजकारणात देखील आल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या परिसरातील छोट्यामोठ्या सामाजिक कामांना प्राधान्य दिलं. यातूनच त्यांच्या वार्डातील लोकांचे प्रश्न सोडवले जाऊ लागले. यातूनच त्यांची लोकप्रियता वाढत गेली. याकाळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या त्या संपर्कात आल्या.

भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि 2002मध्ये मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. पुढे त्यांचा संपर्क गोपीनाथ मुंडे यांच्याशी आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतीय जनता पक्ष पोहचला याचे श्रेय गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडगोळीला दिले जाते. अनेक साध्या कार्यकर्त्यांना त्यांच्यातील प्रतिभा ओळखून राजकारणात येण्याची संधी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाने दिली. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेतृत्वापूढे आव्हान याच तरुण नेत्यांकडून देता येईल हे मुंडे यांनी ओळखलं होतं.    

गोपीनाथ मुंडे यांचा पाठिंबा घेऊन मुक्ता टिळक यांचा पुणे महापालिकेत प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी सलग चार वेळा पालिका निवडणुकीत विजय मिळवला. पुढे त्या महापौर देखील बनल्या. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मानही मुक्ता टिळक यांच्याकडे जातो. महापौरपदापूर्वी त्यांनी पालिकेतील भाजपच्या गटनेत्या स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांची कामगिरी प्रभावी राहिली.  

Mukta Tilak
Pune : खोपोली एक्झिट जवळ द्रुतगतीवर तीन वाहनांचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही

मुक्ता टिळक पुण्याच्या महापौर झाल्यानंतर सव्वा वर्षाचं महापौरपद अडीच वर्षाचं करण्यात आलं. त्यामुळे भाजपच्या सत्तेतील पहिल्या महापौर असतानाच सर्वाधिक काळ महापौरपदी राहण्याचं भाग्यही त्यांना लाभलं. या काळात मुंडे गटाच्या कडव्या समर्थक अशीच त्यांची ओळख पुण्याच्या राजकारणात कायम राहिली.  महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे मोठी लोकप्रियता देखील मिळवली.

Mukta Tilak
Pune News : रश्मी शुक्‍ला यांच्‍या विरोधातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

त्या महापौर असतानाच 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या.  या मतदारसंघात काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचं टिळक यांना आव्हान होतं. जेष्ठ नेते गिरीश बापट यांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभेत मुक्ता टिळक यांनी मोठी आघाडी घेऊन विजय मिळवला होता.

Mukta Tilak
Pune Temperature : पुणे : सलग दोन दिवस तापमान ११.५ अंशांवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com