वळूच्या धडकेमुळे पुणे -सोलापूर रेल्वेसेवा विस्कळीत

वळूच्या धडकेमुळे पुणे -सोलापूर रेल्वेसेवा विस्कळीत
Published on: 

वळूच्या धडकेने पुणे-सोलापूर रेल्वेसेवा विस्कळित
ओव्हरहेड वायरचे नुकसान; दहा गाड्यांवर परिणाम

पुणे, ता. १२ : पुणे विभागातील हडपसर-लोणी स्थानकांदरम्यान ताशी ११० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या पनवेल-नांदेड (१७६१३) एक्स्प्रेसला वळूची जोरदार धडक झाली. बुधवारी रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी ही घटना घडली. वळू उडून ओव्हरहेड वायरला धडकल्याने वायर तुटली. यात वळूचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरहेड वायर अन् खांबाचे नुकसान झाल्याने पुणे-सोलापूर लोहमार्गावरील ‘डाऊन’ मार्गिका पूर्णपणे बाधित झाली. चार गाड्या मिरजमार्गे वळवल्या तर दोन गाड्या त्या त्या स्थानकांवर थाबल्या आहेत.

धडकेत कॉन्टॅक्ट वायर तुटल्याने रेल्वे गाड्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सोलापूरकडे येणाऱ्या चार गाड्यांवर परिणाम झाला आहे.
पनवेल-नांदेड एक्स्प्रेस लोणी स्थानकाजवळ असताना ही घटना घडली. यात ओव्हरहेड वायर अन् खांबाचे मोठे नुकसान झाले. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर वायर जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, एलटीटी एक्स्प्रेस, एकतानगर-चेन्नई एक्स्प्रेस, राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेस अन् पुणे-कन्याकुमारी एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मिरज मार्गे कुर्डुवाडीला येऊन या गाड्या सोलापूरला पोहोचतील. त्यामुळे या गाड्या तीन ते चार तास विलंबाने येण्याची शक्यता आहे.
बिकानेर-यशवंतपूर एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू अन् मदुराई एक्स्प्रेस तळेगाव स्थानकावर उभ्या आहेत. या गाड्या विविध स्थानकांदरम्यान थांबविण्यात आल्या आहेत. या मार्गावरील ‘अप’ मार्गिका मात्र सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
याशिवाय होस्पेट एक्स्प्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस अन् हुसेनसागर एक्स्प्रेस या गाड्यांनाही काही वेळ विलंब होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune-Beed New Railway Service to Begin Regular
Nandigram Express
Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Pune Railway Mega Block
Marathi News Esakal
www.esakal.com