

Cyber Fraud Over Lapsed Insurance Policy
Sakal
पुणे : बंद पडलेल्या आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी वानवडीतील एका व्यक्तीची दोन लाख ५७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.