Domestic Dispute in Hadapsar Leads to Killing Attempt
Sakal
पुणे : कौटुंबिक वादातून पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या कारणावरून पत्नीचा दोरीने गळा आवळून आणि डोक्यात लोखंडी गज मारून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसर येथील महम्मदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.