सासवडला शुक्रवारपासून ‘पुरंदर कृषी’चे आयोजन

सासवडला शुक्रवारपासून ‘पुरंदर कृषी’चे आयोजन
Published on

सासवड, ता. १७ : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी २२ ते २५ मे २०२६ दरम्यान ‘पुरंदर कृषी एक्स्पो’चे आयोजन केले आहे. सासवड येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल, अशी माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी दिली.
प्रदर्शनात १६० व्यावसायिक स्टॉल्ससह महिला बचत गटांचे ५० स्टॉल्स असतील. एआय तंत्रज्ञान, ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक आणि देशी पशुधन प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल. चार दिवसांच्या या महोत्सवात डॉ. सोमनाथ माने (पशु आहार), डॉ. विवेक भोईटे (ऊस शेतीतील एआय), माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि प्रतीक मोरे मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे १०० अवजारे वाटली जातील. शेवटच्या दिवशी बंपर बक्षीस म्हणून ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर दिले जाणार असून, त्यासाठी सातबारा किंवा फार्मर आयडी आवश्यक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व संत सोपानकाका बँक या प्रदर्शनाचे मुख्य भागीदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com