Purandar Airport : पुरंदर विमानतळ झाल्यास पुणे देशाचे ग्रोथ इंजिन बनेन - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्‍यक आहे. त्यामुळे पुरंदर येथील नवीन विमानतळ व्हायला हवे.
Purandar-Airport
Purandar-Airportsakal

पुणे - पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्‍यक आहे. त्यामुळे पुरंदर येथील नवीन विमानतळ व्हायला हवे. हे विमानतळ झाले तर, पुणे हे देशातील महत्त्वाचे ग्रोथचे इंजिन बनेन आणि ते मुंबईची जागा घेईन,असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२५) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, दैनिक पुढारीचे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे, दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस, भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘येत्या २० वर्षातील देशाचे ग्रोथ इंजिन होण्याची पुण्याची आणि ‘पीएमआरडीए’ची क्षमता आहे. पुणे शहर हे नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे शहर आहे. यासाठीच रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत.

पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना याबाबतच्या शंका असल्यास, त्यांचे निरसन करण्यात येईन.विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना समृद्ध होण्याचा अनुभव येईन, असे पॅकेज दिले जाईन.’’

दरम्यान, पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत, यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईन. कारण पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाहीत. त्यामुळे मोहीम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत.

सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे ही महत्त्वाची बाब आहे. माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष राहण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी योगेश जाधव, सम्राट फडणीस, संजय आवटे बाबासाहेब औटी, संजय भोकरे, किरण जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com