Purandar AirportSakal
पुणे
Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी १,२८५ हेक्टर भूसंपादन; शेतकऱ्यांना चारपट मोबदला
Land Acquisition : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन क्षेत्रात १,३८८ हेक्टरची कपात करून आता १,२८५ हेक्टर जमिनीचे संपादन होणार असून, सोमवारपासून शेतकऱ्यांची संमती घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पुणे : शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या क्षेत्रात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सात गावांतील १ हजार २८५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे गावनिहाय संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचे क्षेत्र येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार असून, येत्या सोमवारपासून (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयात संमतिपत्र स्वीकारण्यात सुरुवात करण्यात येणार आहे.

