
पुणे : भूसंपादनाच्या निर्णयाअभावी रखडलेले पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ मार्गी लागण्याच्या दृष्टीने गुरुवारी महत्त्वपूर्ण पाऊल पडले. सहमतीने विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या मोबदल्यात एकूण जमिनीच्या १० टक्के विकसित भूखंड, त्याचबरोबरच बाजारभावाच्या चारपट दराने मोबदला देण्याचा निर्णय मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध संपून भूसंपादन वेगाने होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला आहे.