मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला

पुरंदर, जनाईसह सर्व उपसा योजनांचा वीजदर पूर्ववत
eknat shinde
eknat shindesakal

सासवड : सासवडच्या पालखीतळ मैदानावर पुरंदरवासियांच्या साक्षीने राज्यातील जनतेला दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पाळला. उपसा सिंचन योजनांचा बेसुमार वाढलेला वीजदर कमी करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अवघ्या १९ टक्के रकमेत पाणी द्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी मान्य करत उपसा योजनेचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत शासन आदेश काढत वीजदर पूर्ववत करण्याचा निर्णय जारी केला आहे.

याबाबत आज माजी राज्यमंत्री श्री शिवतारे यांनी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील दिवे पंचक्रोशी, आंबोडी, सिंगापूर, वनपुरी, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, पारगाव, खानवडी, राजेवाडी, टेकवडी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, बेलसर, माळशिरस, मावडी, पिंपरी, पिसर्वे, नायगाव, कोथळे, रानमळा, पांडेश्वर, रोमनवाडी, अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असताना त्यांनी उपसा सिंचन योजनांचा वीजदर १ रुपये १६ पैसे प्रतियुनिट करून अवघ्या १९ टक्के दरात राज्यभरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले होते. शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीची उर्वरित ८१ टक्के रक्कम शिवतारे यांनी राज्यातील कारखान्यांवर लादली होती.

मात्र पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वीजदर १.१६ वरून ३ रुपये ६९ पैसे इतका वाढवला होता. जुन्या दराने शेतकऱ्यांना प्रति दशलक्ष घनफूट पाण्यासाठी साधारणतः १२ हजार रुपये खर्च येत होता. पण अचानक वीजदरात केलेल्या वाढीमुळे हा खर्च ३३ हजार रु प्रति दशलक्ष घनफूट पर्यंत गेला. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यकाळात झालेली ही वाढ आता शिंदे सरकारने रद्द करून पुन्हा शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे., असे श्री शिवतरे प्रसिद्धी पत्रकात म्हणत आहेत.

पूर्व पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वीजदर पूर्ववत केल्यानंतर पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातील विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण होते. याबाबत बोलताना वाघापूर येथील अँड. नितीन कुंजीर म्हणाले, शिवतारे यांच्या मागणीला उचलून धरत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा या भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंददायी आहे. शिंदे सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहे हेच यातून दिसून आले आहे असेही ते म्हणाले. माजी सभापती अतुल मस्के माजी उपसभापती दत्तात्रय काळे गोरक्षनाथ माने, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मानिक निंबाळकर आधी कितीतरी जणांनी या निर्णयाचे आनंद व्यक्त करत स्वागत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com