Purandar Crime
Sakal
पुणे
Purandar Crime : ड्रोनच्या साहाय्याने उसाच्या शेतात लपलेल्या चोरट्यांना पकडले
Police Chase : दौंडज (पुरंदर) येथील चोरट्यांना पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने उसाच्या शेतात शोधून काढले व अटक केली, ग्रामीण पोलिसिंगला मिळाले नविन तंत्रज्ञानाचे बळ!
वाल्हे : पुरंदर तालुक्यातील दौंडज गावात भरदिवसा धाडसी चोरी झाली. मात्र, पोलिस आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेल्या सिनेस्टाईल पाठलागात चोरांना पकडण्यात यश आले. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान ड्रोनचा वापर करून उसाच्या शेतात लपून बसलेल्या चोरट्यांना अचूक शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

