भैरवनाथ विद्यालयाचे एनएमएमएस परीक्षेत यश
सासवड, ता. २७ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती एनएमएमएस परीक्षेत पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वनपुरी येथील श्री भैरवनाथ विद्यालयाने यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ईश्वरी कुंभारकर (८८ गुण), सोहम बोरकर (८५ गुण), संग्राम काळे (८३ गुण), परिणीता हगवणे (७४ गुण), ओम बोरकर (७३ गुण) आणि स्नेहल कुंभारकर (७२ गुण) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
याबरोबरच विज्ञान क्षेत्रातही या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सातवीच्या श्रेयश कुंभारकर याच्या प्रकल्पाचे विशेष कौतुक झाले. तसेच इयत्ता आठवीतील संग्राम काळे आणि अथर्व कुंभारकर यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला.
या यशाबद्दल पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उरसळ, शाळा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र कुंभारकर आणि मुख्याध्यापिका लता बोकड यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी वैशाली यादव, अनिता खेसे, दत्तात्रय रोकडे, सुरेश गोरे यांसह सर्व शिक्षक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

