

सासवड, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुरंदर तालुक्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला.
पुरंदर तालुक्यातून एकूण ३१३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरले होते, त्यापैकी ३१३० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यामधून ३०२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९३४ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, ११६८ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ७३१ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी; तर १९१ विद्यार्थ्यांना तृतीय श्रेणी मिळाली. तालुक्यातील ६४ शाळांपैकी ३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
१०० टक्के निकाल लागलेल्या शाळा : म.ए. सो. वाघिरे विद्यालय सासवड, महात्मा जोतिबा फुले विद्यालय शिवरी. बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर, पारेश्वर विद्यालय पारगाव मेमाणे, यशवंत विद्यालय मावडी (क.प.), सिद्धेश्वर विद्यालय नायगाव, विद्या महामंडळ कोथळे, शिवशंभो विद्यालय, एखतपूर-मुंजवडी, माध्यमिक विद्यालय मांढर, श्री नागेश्वर विद्यालय नाझरे (क. प.), माध्यमिक विद्यालय यादववाडी, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर, मातोश्री जिजाई सोपानराव जाधव विद्यालय साकुर्डे, मावडी-पिंपरी हायस्कूल पिंपरी, माहूर माध्यमिक विद्यालय माहूर, हरणी माध्यमिक विद्यालय हरणी, आदर्श विद्यालय केतकावळे, न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन, नामदेव गंगाराम शिंगाडे विद्यालय गुऱ्होळी, श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद, श्री सद्गुरू नारायण महाराज विद्यालय नारायणपूर, श्री बाबालाल साहेबराव काकडे विद्यालय पिंपरे (बु.), गुरुवर्य नारायण महाराज विद्यालय हिवरे, राजुरी माध्यमिक विद्यालय राजुरी, श्री सद्गुरू कानिफनाथ विद्यालय बोपगाव, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय शाळा दिवे, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल जेजुरी, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वाघापूर, इंदू इंग्लिश मीडियम स्कूल कोळविहारे, श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर, कल्याणी पब्लिक स्कूल बेलसर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.