पानवडी, काळदरीतील पर्यटनास ‘ग्रँड टूर’मुळे चालना

पानवडी, काळदरीतील पर्यटनास ‘ग्रँड टूर’मुळे चालना
Published on

संतोष जंगम : सकाळ वृत्तसेवा
परिंचे : पुरंदर किल्ल्याच्या दक्षिण भागात पानवडी, काळदरी, बहिरवाडी परिसर नैसर्गिक धबधबे, बहरलेले भात, हिरवाईने नटलेले डोंगर, खोल दऱ्यांच्या अद्‌भुत निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आंतरराष्ट्रीय ‘ग्रँड टूर’मुळे सुसज्ज झालेल्या रस्त्यांमुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे. येथील पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी स्वातंत्र्यदिन तसेच त्यानंतर आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या खूपच वाढली होती.
पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. वर्षाविहारासाठी येणारे पर्यटक पानवडी परिसरास मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखतात. सासवड शहरापासून सुपे मार्गे पानवडी, काळदरी, बहिरवाडी या गावांना जाता येते. पानवडी घाट वाहतुकीसाठी सुरक्षित असून रस्त्याच्या कडेला संरक्षक जाळ्या तसेच कठडे बांधले आहेत. पाणवडी घाटातील निसर्गसौंदर्य तसेच पाणवडी गावातील लाचुंडी आई मंदिर धबधबा पाहण्यास पर्यटकांनी पसंती दिली.

पर्यटकांचे आकर्षण
- घनदाट झाडी
- वज्रगडापासून वाहत येणाऱ्या पाण्यावर तयार झालेला धबधबा
-पाटजाई पाझर तलाव, नवरा नवरीचा डोंगर,
- निष्नाई देवीचा सुळक्याचा शेंडा,
- वज्रगडाशेजारी रडतोंडी धबधबा


अनेक शासकीय योजनांचा आधार घेऊन या परिसरात अनेक पाझर तलावांची निर्मिती केली आहे. पाटजाई पाझर तलाव या ठिकाणी ‘सकाळ’ रिलीफ फंडातून कृत्रिम धबधबा निर्माण केला असून फिनोलेक्स पंप फंडातून गेल्या पाच वर्षांपासून नौका विहार सुरू करण्यात आला असल्याने येथील तरुणांना रोजगाराचे नवे साधन निर्माण झाले आहे.
- डॉ. अक्षय भिसे, स्थानिक


गेल्या पाच वर्षांपासून या गावातील स्थानिक तरुणांनी हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. पर्यटकांना या ठिकाणी गावरान चव चाखायला मिळत असल्याने चुलीवरचे जेवण तसेच मांसाहारी जेवण या ठिकाणी चांगले मिळत असल्याने शनिवारी, रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
- दीपक भिसे, हॉटेल व्यावसायिक

बुशी डॅमच्या धर्तीवर धबधबे तयार करणार
बहिरवाडी परिसरातील निसर्ग सौंदर्य ओळखून पर्यटन विकासासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. भविष्यात लोणावळा येथील बुशी डॅमच्या धर्तीवर येथील बंधाऱ्यातील वाहणाऱ्या पाण्यावर पायऱ्या पद्धतीने धबधबे तयार करून पर्यटकांना अनेक सुविधा तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com