चीनमधील संगणकांची खरेदी थंडावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या संगणक आणि सर्व्हरची खरेदी चीनमधून करतात. मात्र, कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे आयात बंद झाल्याने कंपन्यांची अडचण झाली आहे. 

पिंपरी - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या संगणक आणि सर्व्हरची खरेदी चीनमधून करतात. मात्र, कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे आयात बंद झाल्याने कंपन्यांची अडचण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीत चीन आघाडीवर आहे. या वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, उत्पादनक्षमता आणि त्याचा दर्जा या कारणांमुळे आयटी कंपन्या चीनमधून नवीन संगणक, सर्व्हर यांची खरेदी करत असतात. चीनमध्ये जानेवारीपासून कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर येथील उत्पादन प्रकल्प बंद करण्यात आले. त्यामुळे इतर देशांमधील आयातदेखील थांबविली आहे. जानेवारीत काही आयटी आणि स्टार्टअप कंपन्यांनी नवीन संगणक आणि सर्व्हर खरेदी करण्याची मागणी चीनी कंपन्यांकडे नोंदवली. मात्र, तेथील अर्थव्यवस्था आणि दळणवळण ठप्प असल्यामुळे त्याची पूर्तता कधी होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक कंपन्यांचे भागीदार चीनमध्ये आहेत. मात्र, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पाठविणे बंद केले आहे.

आयटी कंपन्यांमधील कर्मचारी चीनमध्ये अडकले असल्यास, तसेच त्यांना मदत मिळण्यात अडचणी येत असेल तर त्यांनी राज्य सरकार किंवा आमच्याशी संपर्क साधावा. 
- पवनजित माने, अध्यक्ष,  फोरम फॉर आयटी एम्प्लाईज
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase of computers in pimpri is less