शिवसेनेला धक्का! निवडणुकीच्या तोंडावर गजानन चिंचवडे भाजपमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला धक्का! निवडणुकीच्या तोंडावर गजानन चिंचवडे भाजपमध्ये

शिवसेनेला धक्का! निवडणुकीच्या तोंडावर गजानन चिंचवडे भाजपमध्ये

पुणे : शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी बुधवारी (ता. २२) भाजपमध्ये प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारने यांचे राइट हॅंड अशी चिंचवडे यांची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेला गजानन चिंचवडे यांच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत कामगार नेते अमोल थोरात यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा: नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली; महिनाभरात तीस टक्के भर

गजानन चिंचवडे हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारने यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. चिंचवडे यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्या दोनवेळा निवडून आल्या होत्या. मात्र, स्थायी समितीच्या सदस्य पदावर त्यांची वर्णी लगली नाही. यामुळेच त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आज पार पडलेल्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते. तसेच चिंचवडचे आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप उपस्थित होते.

टॅग्स :Bjp