चोर तो चोर वर शिरजोर, महावितरण कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maramari

चोर तो चोर वर शिरजोर; महावितरण कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

पुणे : बेकायदा वीज जोड घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण वीज (MSEB) कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एकाने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केसनंद गावामध्ये घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस (lonikand police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गणेश श्रीखंडे (वय 33 , रा. वाघोली, नगर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महावितरण वीज कंपनीचे कर्मचारी आहेत. नगर रस्ता भागातील वाघोली-केसनंद रस्त्यावरील जोगेश्‍वरी सनसिटी जवळील एका जागेत बेकायदा वीज जोड घेतल्याची माहिती फिर्यादी श्रीखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी अंजन शिंगणे हे दोघेजण शनिवारी सकाळी अकरा वाजता संबंधीत ठिकाण कारवाई करण्यासाठी गेले.

हेही वाचा: बैलगाडा मालकांवरील गुन्हे घेणार मागे - गृहमंत्री वळसे पाटील

त्या वेळी तेथे असलेल्या एका व्यक्तीने श्रीखंडे व शिंगणे यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीने शिंगणे यांच्या हातातील 10 हजार रुपयांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास पाटील करीत आहेत.

टॅग्स :pune